तुमचे ऑनलाइन खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा.


काही मदत हवी असेल तर संपर्क करा: दामिनी मामिलवाड 8669175698

समभाग आधारित योजनेत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून सर्वाधिक फायदा मिळू शकतो. अशा प्रकारातील योजनेत शेअरबाजाराची जोखीम असते म्हणूनच दीर्घकाळात या योजनेतून जास्त फायदा मिळू शकतो. मात्र अल्पकालीन नुकसानही होऊ शकते. नुकसानीचा कालावधी १ ते २ वर्षे इतका असू शकतो म्हणून ज्यांची मानसिकता नुकसानीत विचलित न होता बाजारात परत तेजी येईपर्यंत थांबण्याची तयारी असेल त्यांनी या प्रकारातील योजनेत गुंतवणूक करावी. “श्रद्धा और सबुरी” यावर विश्वास ठेवला तर यात प्रत्येकालाच फायदा मिळू शकतो, त्यासाठी नशीब वगैरे काही लागत नाही. थांबण्याची मात्र तयारी असली पाहिजे. एक लक्षात ठेवले पाहिजे कि मंदी जास्त काळ रहात नाही. तेजीनंतर मंदी व मंदीनंतर तेजी हे चालूच रहाते. मात्र गुंतवणुकीसाठी चांगली योजना निवडली पाहिजे, कोणत्यातरी योजनेत कोणाच्यातरी सांगण्यावरून गुंतवणूक करू नये. आम्ही योजना निवडण्यासाठी मदत करतो.

समभाग आधारित योजनेतील गुंतवणुकीवर आयकरातून काही सूट मिळते काय?

दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने म्युचुअल फंडाच्या ५ प्रकारच्या योजनाअसतात.

  1. - ELSS (Equity Linked Savings Schemes)
  2. - क्षेत्रीय योजना (Sectorial Funds)
  3. - वैविध्यपूर्ण इक्विटी योजना (Diversified Equity Schemes)
  4. - Global Fund
  5. - Hybrid Fund

समभाग आधारित योजनेत शेअरबाजाराची जोखीम अतर्भूत तर असतेच. पण हुशार गुंतवणूकदारांना हे माहित असते कि ज्याप्रमाणे ताजमहाल सारखे शिल्प एका दिवसात निर्माण करता येत नाही त्याचप्रमाणे इक्विटी योजनेतून चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळाचाच विचार केला पाहिजे, तसेच त्यासाठी संयमहि ठेवावा लागेल.

समभाग आधारित योजनेत एक वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक केल्यास रु रुपये एक लाखांपर्यंतचा नफा हा करमुक्त असतो आणि जर फायदा एक लाखांपेक्षा जास्त असेल तरच फक्त १०% दराने Long Term Capital Gain tax भरावा लागतो.

तुम्ही ३ वर्षे किंवा अधिक काळासाठी कर्जरोखे आधारित योजनेत (Debt Schemes) गुंतवणूक करून, जरी दोन्ही गुंतवणुकीवर समान दराने परतावा मिळाला तरीसुद्धा बँक ठेवींपेक्षा करपाश्च्यात जास्त परतावा मिळू शकतो (बाजूचे टेबल पहा). सर्वसामान्यपणे कर्जरोखे आधारित योजनेत (Debt Schemes) बँक ठेवींपेक्षा ०.५% ते २% जास्त परतावा मिळतो अधिक कर बचत असा इतिहास आहे..

Safety (सुरक्षितता)
  1. - कर्जरोखे आधारित योजनेत (Debt Schemes) तुलनेने कमी क्रेडीट जोखीम असते.
  2. - या प्रकारातील योजनेत व्याज दरातील चढ उताराचा परिणाम होतो. जर आर.बी.आय. ने व्याज दारात वाढ केली तर
  3. - या योजनेतील परतावा कमी होतो व जर व्याजदर कमी केले तर परतावा वाढतो. तसेच या योजनेत अन्य काही
  4. - या योजनेतील परतावा कमी होतो व जर व्याजदर कमी केले तर परतावा वाढतो. तसेच या योजनेत अन्य काही
  5. - मात्र बदलणाऱ्या व्याजदरामुळे संधी जाऊ शकते ह ए लक्षात ठेवले पाहिजे.

डेब्ट फंड्स हे तरल असतात म्हणून गरज लागल्यास केव्हाही पैसे काढता येतात. प्रचलित कर रचनेनुसार डेब्ट योजनेत गुंतवलेले पैसे ३ वर्षानंतर काढले तरच लॉंग टर्म कॅपिटल गेन वर कर मिळणारा इंडेस्कसेशनचा लाभ मिळतो, यासाठी या योजनेतील गुंतवणूक किमान ३ वर्षे करावी लागते. मात्र जर आत्यंतिक गरज भासली तर योजनेला लागू असणारा निर्गमन आकार रून पैसे केव्हाही काढण्याची सुविधा उपलब्ध असते. या मुळे या योजनेत तरलता आहे.

सडेब्ट फंड्स मधून बँक ठेवी पेक्षा जास्त परतावा मिळतो. या प्रकारातील योजनेत व्याज दरातील चढ उताराचा परिणाम होतो. जर आर.बी.आय. ने व्याज दारात वाढ केली तर या योजनेतील परतावा कमी होतो व जर व्याजदर कमी केले तर परतावा वाढतो. तसेच या योजनेत अन्य काही जोखिमी असतात. मात्र या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही यातील जोखीम समजून गुंतवणूक केली पाहिजे. तसेच तुमच्यासाठी योग्य योजना निवडणे हि सुद्धा एक अत्यावश्यक बाब असते. त्यासाठी ही तुम्हाला मदत करतो.

बँक ठेवींवरील व्याज हे तुमच्या उत्पन्नात वाढवले जाते व त्यावर प्रचलित दराने आयकर भरावा लागतो. ज्या व्यक्ती ३०% दराने आयकर भारतात त्यांना हा कर त्याच दराने भरावा लागतो. जर डेब्ट फंडातील पैसे ३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी काढले तर त्यावर मिळणारा लाभही बँक ठेवींवरील याजाप्रमाणेच करपात्र असतो, मात्र जर गुंतवणूक ३ वर्षे किंवा अधिक काळासाठी केली तर लॉंग टर्म कॅपिटल गेन वर इंडेस्कसेशनचा लाभ मिळतो व त्यानंतर होणाऱ्या फायद्यावर २०% दरानेच कर भरावा लागत असल्याने भरपूर जास्त फायदा मिळतो. बाजूचे टेबल पहा.

बहुतांशी तज्ञ आर्थिक सल्लागारांचे असे मत आहे कि प्रत्येक व्यक्तीने भविष्यात येऊ शकणाऱ्या अडचणींचा विचार करून किमान ६ ते ८ महिन्यांसाठी लागणाऱ्या मासिक खर्चाची सोय इमर्जन्सी फंड स्वरुपात केली पाहिजे. यासाठी तुम्ही बाजूच्या टेबलमध्ये तुमच्या गरजेनुसार बदल करून तुमच्याकडे किती इमर्जन्सी फंड असला पाहिजे ते पाहू शकता.

कोणते लिक्विड फंड्स गुंतवणुकीसाठी चांगले आहेत?

प्रत्येक म्युचुअल फंडाचा किमान एक तरी लिक्विड फंड असतोच. सर्वांचेच रिटर्न्स जवळपास सारखे असतात, थोडाफार फरक असतो. काही योजनेत डेबिट कार्डही दिले जाते ज्याचा वापर करून तुम्ही कोणतीही बिलेसुद्धा भरू शकता. बँकेच्या ATM मधून पैसेही काढता येतात. योजना निवडण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.

इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी आपल्या बँक बचत खात्यात पैसे बचत करून ठेवण्यापेक्षा ते जर का तरल योजनेत (Liquid Schemes) गुंतवणूक केली तर जास्त चांगले होते कारण या योजनेत जवळपास जोखीम नसते व रोजच गुंतवणुकीचे मूल्य वाढत असते. या योजनेतून सर्वसाधारणपणे वार्षिक सरासरी ६ ते ६.५% परतावा मिळत असतो. या योजनेतील गुंतवणूक हि ९० दिवसांच्या मनी-मार्केट पेपर्समध्ये केली जात असल्याने व्याजदर फरकाची किंवा क्रेडीट रिस्कची जोखीम जवळपास रहात नाही. त्याचप्रमाणे या योजनेत कितीही दिवसांसाठी गुंतवणूक करता येते कारण या योजनेत निर्गमन आकार नसतो.

प्रत्येक म्युचुअल फंडाचा किमान एक तरी लिक्विड फंड असतोच. सर्वांचेच रिटर्न्स जवळपास सारखे असतात, थोडाफार फरक असतो. काही योजनेत डेबिट कार्डही दिले जाते ज्याचा वापर करून तुम्ही कोणतीही बिलेसुद्धा भरू शकता. बँकेच्या ATM मधून पैसेही काढता येतात. योजना निवडण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.

म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना एसआयपी माध्यमातून दर महिना ठराविक तारखेला ठराविक रक्कम दीर्घ काळासाठी गुंतवणे हे सर्वोत्तम गुंतवणुकीचे मध्यम समजले जाते.

एसआयपी म्हणजे काय?

Systematic Investment Plan (SIP). म्हणजेच एसआयपी हा म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग मानला जातो. एसआयपी माध्यमातून गुंतवणूक करणे हे जवळपास बँकेत किंवा पोस्टात आर.डी. सुरु करण्यासारखेच असते. फरक इतकाच असतो कि आर.डी. मध्ये तुम्हाला निश्चित दराने व्याज दिले जाते जे तुम्हाला तुमची आर.डी. सुरु करतानाच सांगितले जाते. मात्र एसआयपी सुरु करताना तुम्हाला असे कोणतेही खात्रीशीर परतावे सांगितले जात नाहीत. मात्र दीर्घ मुदतीत एसआयपीच्या गुंतवणुकीतून निश्चितच चांगले परतावे मिळू शकतात. एसआयपी तुम्ही साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक तत्वावर सुरु करू शकता. सर्वसाधारणपणे दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम एसआयपी माध्यमातून गुंतवणे हे चांगले मानले जाते.

सर्वसामान्य माणसाकडे शेअरबाजाराचे पुरेसे ज्ञान नसते तसेच त्यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो अशा व्यक्तींनी एसआयपी माध्यमातून नियमितपणे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून चांगला लाभ मिळवणे जास्त श्रेयस्कर मानले जाते. कारण योजनेचा व्यवस्थापक तुमच्या गुंतवणुकीची काळजी घेत असतो. एसआयपीचे काही फायदे खालीप्रमाणे:

  1. - रुपयाच्या किमतीची सरासरी होत असल्यामुळे जोखीम कमी होते.
  2. - नियमितपणे दर महिन्याच्या ठराविक तारखेला गुंतवणूक होत असल्यामुळे गुंतवणुकीची शिस्त लागते.
  3. - एसआयपी ची सुरुवात अगदी कमी रकमेने करता येते त्यामुळे कोणीही एसआयपी सूरु करून शेअरबाजाराचा लाभ घेऊ शकतो.
  4. - एसआयपी हि दीर्घ मुदतीसाठी फायदेशीर असल्यामुळे बाजारातील तेजी/मंदीच्या कलाची काळजी न करता केव्हाही एसआयपी सुरु करता येते.
  5. - एसआयपीच्या माध्यमातून दीर्घ मुदतीची उदिष्ठ सहजपणे साध्य करता येतात. उदा. मुलांचे शिक्षण, मुलांचा विवाह, निवृत्तीची सोय करणे, घर घेणे इ. दीर्घकालीन उदिष्ठ सहजपणे साध्य करता येतात.
  1. - म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक एक वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी असल्यास लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स चा फायदा मिळतो व आयकर फक्त १०% दराने तो सुद्धा रुपये एक लाखांपेक्षा जास्त फायद्यावरच भरावा लागतो. कारण एक लाखांपर्यंतचा नफा हा करमुक्त आहे.
  2. - ELSS (Equity Linked Savings Schemes) या प्रकारातील योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कलम ८०-सी अंतर्गत वजावट प्राप्त होते. प्रत्येक म्युचुअल फंडाची अशी एक करबचत योजना असते.
  3. - कमीतकमी लॉक-इन-पिरिअड: ELSS य योजनेत केलेल्या गुंतवणुकीला सर्वात कमी म्हणजे फक्त ३ वर्षांचा लॉक-इन-पिरिअड असतो. जो अन्य कोणत्याही कर बचतीच्या गुंतवणूक साधनांपेक्षा कमी आहे.
  4. - तरलता (Liquidity): म्युचुअल फंडाच्या ओपन एन्डेड योजनेत केलेली गुंतवणूक केव्हाही काढता येत असल्याने सर्वाधिक तरलता असते.
लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स

लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स

वर्ष २०१८-१९ पासून म्युचुअल फंड गुंतवणुकीवर १०% इतक्या कमी दराने लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स सुरु झालेला आहे मात्र एक लाखांपर्यंतचा लॉंग टर्म कॅपिटल गेन हा करमुक्त आहे. हा कर पैसे काढल्यावरच भरावा लागतो.


कर्जरोखे आधारित योजना:

अशा योजनेत केलेली गुंतवणूक जर ३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी काढली तर होणारा फायदा हा उत्पन्नामध्ये वाढवला जातो व त्यावर तुमच्या आयकर आकारणीनुसार कर भरावा लागतो.मात्र जर पैसे ३ वर्षे पूर्ण झाल्यावर काढले तर इंडेक्ससेशनचा फायदा मिळतो व उरलेल्या रकमेवर २०% दराने कर भरावा लागतो जो अत्यल्प असतो. म्हणून हा पर्याय बँक एफडीला उत्तम मनाला जातो./p>

म्युचुअल फंडातून दिल्या जाणाऱ्या लाभांशाच्या रकमेतून मुळातच डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स कापून सरकारकडे भरावी लागत असल्यामुळे गुंतवणूकदाराच्या हातात मिळणारा लाभांश हा त्याला करमुक्त असतो. इक्विटी योजनेला हा दर १०% आहे तर डेब्ट योजनेला कारचा दर हा २८% एवढा आहे.


म्युचुअल फंडाच्या संतुलित प्रकारातील योजनेत बहुतांशी दर महिना किंवा त्रैमासिक तत्वावर लाभांश दिला जातो. उत्पन्न हवेमिळणाऱ्या करमुक्त लाभांशाची सरासरी वार्षिक ९% ते १२% एवढी असते. मात्र असा हा लाभांश नियमितपणे दिला जाईलच अशी कोणतीही खात्री योजनेत दिलेली नसते


जर तुम्ही निवृत्त व्यक्ती असाल व जर तुम्हाला पेन्शन प्रमाणे नियमित करमुक्त उत्पन्न हवे असेल तर योग्य योजना निवडण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Take look at our

बचत करण्यापेक्षा गुंतवणूक करणे केव्हाही चांगले असते

आपली भविष्यातील उदिष्ठ साध्य करण्यासाठी आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळाला पाहिजे .

Watch now
We take care of you
We take care of you
तुम्हाला जास्त परतावा मिळावा असे वाटत असेल तर

थोडी जोखीम स्वीकारून समभाग आधारित

योजनेत गुंतवणूक केली पाहिजे आणि चांगला पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे.
Contact Now

DRKM Financial Services

म्युचुअल फंडात जर आपण प्रथमच गुंतवणूक करणार असाल तर केवायसी करणे अनिवार्य आहे.

हि केवायसी हि एकदाच करावी लागते.

आमच्याकडे केवायसी (KYC ) ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

याकरिता आम्हाला प्रत्यक्ष भेटणे हे गरजेचे नाही.यासाठी आमच्या लिंक वरून तुम्ही स्वतः kyc करू शकता.

किंव्हा आम्हाला आमच्या इमेल आयडीवर मेल करून कागदपत्रे पाठवून आमच्याकडून केवायसी (KYC) पूर्ण करू शकता.

E-KYC सुरु आहे
drkm financial services

आम्ही तुम्हाला सेवा देण्यास इच्छुक आहोत

Testimonial

Contact Us

(Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).