Take look at our

About DRKM Group

DRKM Financial Services मध्ये आम्ही प्रथम गुंतवणूकदारांशी प्रत्यक्ष अथवा फोनवर चर्चा करून त्यांची जोखीम स्विकारण्याची तयारी, ते कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करू इच्छितात, किती काळासाठी गुंतवणूक करू इच्छितात याची चर्चा करतो. तसेच म्युच्युअल फंडातील योजना या बाजाराशी निगडित असल्यामुळे त्यात असणाऱ्या जोखीमीची व मिळणाऱ्या फायदाची संपूर्ण माहिती देतो. यानंतर ग्राहकाच्या उदिष्ठांनुसार त्यांचेसाठी गुंतवणुकीचे नियोजन करून त्याप्रमाणे संरचीत पोर्टफोलिओ (Portfolio) बनवतो. त्यातील फायदे तोटे यांची माहिती परत करून देतो आणि त्यानंतर गुंतवणुकीचा सल्ला देऊन गुंतवणूक करण्यासाठी मदत करतो.

हे करत असताना DRKM Financial Services मध्ये आम्ही पूर्वग्रह विरहित ग्राहकाला फायदेशीर होईल याचप्रकारे वेगवेगळी गुंतवणूक साधने निवडण्यास मदत करतो. त्यासोबतच हे नियोजन करत असताना पुढील गोष्टींचाही विचार करतो ज्या तुमच्या जीवनाशी निगडित असतात जसे कि, जिवन विमा , आरोग्य विमा, तातडीच्या आर्थिक गरजेचे नियोजन करणे, मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करणे, निवृत्ती नंतरच्या जीवनासाठी आर्थिक तरतूद करणे, याचबरोबर अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या उदिष्ठांची पूर्तता वेळच्यावेळी होण्यासाठी त्याप्रमाणेच गुंतवणूक साधनांची निवड करण्यास मदत करतो. यासाठी आम्ही म्युच्युअल फंडाच्या विविध प्रकारचं समभाग व कर्जरोखे आधारित योजनांची निवड करण्यासाठी मदत करतो.

Conact Now

DRKM Financal Services/p>

इतिहास

DRKM Financial services या नावाने सेवा देणारा व्यवसाय 1 एप्रिल 2020.रोजी सुरू करण्यात आला आहे.

8710

Clients

35

Creditors

12

awards

Take look at our

Our team

Jayshree Mamilwad
Wealth Manager

गुंतवणुकीचे तत्वज्ञान.

शेअर बाजारातून पैसे मिळवण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते वेळ, शेअरबाजाराचा अभ्यास आणि आपल्या निर्णयाची खात्री. या तीन गोष्टी ज्याच्याकडे असतात त्याला निश्चितपणे शेअरबाजारातून फायदा मिळतो आणि ज्यांच्याकडे या तीन गोष्टींचा अभाव असतो त्यांना निश्चितपणे नुकसान होते. म्हणूनच शेअरबाजारातून फक्त १०% लोकांना फायदा व बाकीच्यांना नुकसान होत असते. म्हणूनच जर तुमच्याकडे यातील कोणतीही एक गोष्ट नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंदातच गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे होते. कारण म्युच्युअल फंडाची कोणतीही योजनेच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन एक तज्ञ फंड मॅनेजर करत असतो. तो पूर्ण वेळ हेच काम करत असल्यामुळे त्याच्याकडे पुरेसा वेळ असतो. तो उच्च शिक्षित असतो व त्याने शेअरबाजाराचा पूर्ण अभ्यास केलेला असतो, आणि तो सततच अभ्यास करत असतो म्हणून त्याला या विषयाचे आवश्यक ते ज्ञान असते. आणि तो जे गुंतवणुकीचे निर्णय घेतो त्याबाबत त्याची पूर्णपणे खात्री झालेली असते. आणि म्हणूनच दीर्घ मुदतीत म्युच्युअल फंडाच्या योजनेतून उत्तम परतावा मिळालेला आहे. बाजाराची जोखीम हि अल्पकालीन असते व फायदा हा दीर्घ काळात होतोच.

(Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).