DRKM Financial Servicesr
आजकालच्या धावपळीच्या जीवनात कधीही काहीही होऊ शकते. अपघात तर नित्यनेमानेच घडत असतात. अपघातात अनेक लोकं मृत्यूमुखी पडत असतात. अशावेळी आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे आर्थिकमान बिघडू नये हि प्रत्येकाचीच इच्छा असते म्हणून टर्म इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजे पती/पत्नी, मुले हि कधीही आजारी पडू शकतात आणि एकदा का आजारपण आले कि अतोनात पैसा खर्च करावाच लागतो. जर पैसा आपल्याकडे नसेल तर उधार उसनवार करूनही वैद्यकीय उपचार हे करावेच लागतात. हा असा प्रसंग आला तर पैशाची चिंता असू नये यासाठी प्रत्येकानेच आरोग्य विमा हा घेतलाच पाहिजे
विमा घेण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपल्या पश्चात आपल्या वारसांना कोणाकडे हात पसरावा लागू नये, नैमित्तिक खर्चासाठी कोणते तरी हलके सालके काम करावे लागू नये, मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, इ. कारणांसाठी प्रत्येकाने विमा हा घेतलाच पाहिजे. मात्र तो टर्म इन्शुरन्स स्वरूपातच घ्यावा कारण या प्रकारात कमी हप्ता भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण प्राप्त होते. कोणत्याही पारंपरिक विमा योजनेतून अत्यल्प विमा कवच मिळते ज्याचा काहीच उपयोग नसतो आणि त्यावर मिळणारा वार्षिक परतावा हा साधारणपणे फार तर ४% दराने मिळत असतो. तुमची गुंतवणूक हि अन्य कोणत्याही गुंतवणूक साधनात करावी मात्र अशा गुंतवणूक साधनातून मिळणारा परतावा हा वाढणाऱ्या महागाईवर मात करून व आयकरात बचत करणारा असावा असे पाहावे. यासाठी म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार व जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार म्युच्युअल फंडाच्या विविध प्रकारच्या योजना उपलब्ध असतात.
जीवनावरील विमा पॉलिसी घेताना हे अवश्य पहिले पाहिजे कि मी कितीं रकमेचा जीवन विमा घेतला आहे? तो पुरेसा आहे का? विमा पॉलिसी कोणत्या प्रकारची आहे? ती माझी विम्याची गरज भागवण्यासाठी योग्य आहे काय? जर तुम्ही चुकीची विमा पॉलिसी घेतलेली असेल तर ती सरेंडर करण्याची तुम्ही मानसिक तयारी ठेवली पाहिजे कारण विमा योजनेत पुढील हप्ते भरत रहाण्यापेक्षा जर दुसरी कमी हप्ता व जास्त सुरक्षा देणारी योग्य पॉलिसी घेऊन जास्त जाणारी विमा हप्त्याची रक्कम अन्य गुंतवणूक साधनात गुंतवून तुम्ही जास्त फायदा मिळवू शकता हे लक्षात ठेवले पाहिजे.
संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य सेवेसाठी येणारा खर्चाची सोय याव्दारे करता येते. एकाच योजनेतून व एकच हप्ता भरून सर्वाना सुरक्षा प्राप्त होते. प्रत्येकाला वेगळा विमा घ्यावा लागत नाही. तुमच्यासह तुमचा जोडीदार आणि तुमची मुले या सर्वांसाठी एकच पॉलिसी मिळते
Conact uSe