मोटार इन्शुरन्स
तुमच्या दुचाकी, चारचाकी गाडीचा विमा घेऊन तुम्ही दुर्दैवाने तुमच्या वाहनाचा जर अपघात झाला तर त्यापासूनचे संरक्षण तुम्हाला प्राप्त होते. यामध्ये अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती इ. मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून मिळते.मोटार इन्शुरन्सची आवश्यकता असते काय?
आपल्या भारत देशात दार महिन्याला सरासरी ४ लाख अपघात होत असतात. मोटार कार अपघातात दरवर्षी सरासरी ४% दराने वाढ होत असते. प्रतिदिन वाढणारी गाड्यांची संख्या आणि राज्यातील खराब दर्जाचे रस्ते यामुळेही अपघातात नेहमीच वाढ होत असते, यासाठी मोटार इन्शुरन्स हा अत्यंत गरजेचा आहे. याशिवाय कायद्याप्रमाणेसुद्धा वाहनाचा विमा उतरवणे बंधनकारक आहे. मोटार इन्शुरन्सचा लाभ फक्त तुम्हालाच मिळत नाही तर त्याचा लाभ तुमच्या बरोबर प्रवास करणाऱ्यांनाही मिळतो. तसेच यात नैर्सर्गिक आपत्तीचासुद्धा, ज्यात भूकंप, पूर, आग, इ. बाबींचा समावेश असतो.मोटार इन्शुरन्सचे प्रकार
१) थर्ड पार्टी इन्शुरन्स
कायद्यानुसार हा बंधनकारक आहे. अपघातात जर कोणत्या अन्य व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा शारीरिक इजा झाली किंवा कोणत्या अन्य मालमत्तेचे नुकसान झाले तर विमा कंपनीकडून त्याची नुकसान भरपाई मिळते. थर्ड पार्टी म्हणजे अपघातात सापडलेल्या अन्य व्यक्ती. मात्र यामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या बरोबर प्रवास करणाऱ्या सोबतच्या व्यक्ती किंवा तुमच्या गाडीला अपघाताने काही नुकसान झाले किंवा मृत्यू आला तर कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही.२) सर्व समावेशक (Comprehensive) इन्शुरन्स
या प्रकारात वरील थर्ड पार्टी इन्शुरन्स मधील मिळणाऱ्या लाभांव्यतिरिक्त तुम्ही स्वतः, तुमची गाडी आणि तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे अपघातामुळे काही नुकसान झाले तर त्याची भरपाई सर्व समावेशक (Comprehensive) इन्शुरन्स घेतल्यामुळे मिळते. यासाठीच विमा घेताना हा पर्याय, जरी बंधनकारक नसला तरीसुद्धा, घेणे हे तुमच्या हिताचेच असते.मोटार इन्शुरन्सबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१) मोटार इन्शुरन्स का घ्यावा?
प्रत्येक व्यक्ती अथवा संस्था जिच्या मालकीचे कोणतेही वाहन असेल त्या वाहनाचा मोटार इन्शुरन्स हा घेतलाच पाहिजे. मग ते वाहन व्यक्तिगत वापरासाठी असो किंवा व्यावसायिक वापराचे असो त्याचा विमा घेणेआवश्यक आहे.2) मोटार इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे काय?
वैयक्तिक मालकीचे असो किंवा संस्थेच्या मालकीचे असो, व्यक्तिगत वापरासाठी असो किंवा व्यावसायिक वापरासाठी असो, प्रत्येक वाहनासाठी मोटार इन्शुरन्स घेणे हे मोटार वाहन कायदा १९८८ नुसार, बंधनकारक आहे. जेव्हा एखादे वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वीच त्या वाहनाचा विमा इन फोर्स असलाच पाहिजे. दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी आणि व्यावसायिक अशा प्रकारातील प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र प्रकारचे विम्याचे प्रकार असतात.३) मोटार इन्शुरन्स काढण्याचे काय फायदे असतात?
हे एक प्रकारचे आर्थिक सुरक्षा कवच असून त्यापासून मिळणारी नुकसान भरपाई खालील प्रमाणे असते: विमा धारकाला किंवा अन्य व्यक्तीला झालेल्या शारीरिक नुकसानीची भरपाई. शारीरिक नुकसानीमुळे झालेल्या पगाराची नुकसान भरपाई. अपघाती मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम वारसाला मिळते. अपघाता नंतर जर तुमच्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल केला गेला तर त्यासाठी येणाऱ्या खर्चाची भरपाई. अपघातात गाडीचे नुकसान झाल्यास दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाची भरपाई.४) मोटार इन्शुरन्समध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट असतात?
विमा कवच घेणारी व्यक्ती, ज्याचा विमा घेतलेला आहे असे वाहन, ज्यांना अपघातामुळे नुकसान होते अशा थर्ड पार्टीज (अन्य व्यक्ती आणि वाहन) याचा समावेश मोटार इन्शुरन्समध्ये होतो. विम्याचा हप्ता हा व्यक्तिसापेक्ष बदलत असतो अधिक माहिती तुमचा सल्लागार किंवा आम्ही देऊ शकतो.५) मोटार इन्शुरन्समध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होत नाही?
नियमित वापरामुळे झालेले गाडीचे नुकसान, नियमितपणे करावी लागणारी गाडीची दुरुस्ती, दारू पिऊन गाडी चालवत असताना अपघात झाल्यास आणि युद्धजन्य परिस्थितीत अपघात झाल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. मिळणारी नुकसानभरपाई हि शोरूम किंमत किंवा घसारा वजा केल्यानंतर गाडीच्या होणाऱ्या किंमतीनुसार दिली जाते.६) IDV म्हणजे काय?
IDV = Insured declared value म्हणजे गाडीच्या विमा कवचाची रक्कम हि गाडीच्या घसारा वजा जात उडणाऱ्या किमतीएवढी किंवा शोरूम प्राईज यानुसार विमा कम्पनीच्या नियमानुसार ठरवली जाते.७) प्रत्येक विमा कंपनीचा विम्याचा हप्ता वेगवेगळा का असतो?
प्रत्येक विमा कंपनी त्यांच्या अनुभवानुसार किंवा सांख्यिकी शास्त्राचा आधार घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने विमा हप्त्याची गणना करत असतात. काही विमा कंपन्या एखाद्या क्षेत्रात तज्ञ असतात म्हणून त्या काही बाबतीत हप्त्यांमध्ये सवलत देतात. या व्यतिरिक्त प्रत्येक कंपनीचे नफा मिळवण्याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.८) मोटार इन्शुरन्सचा हप्ता कोणत्या निकषांवर ठरवला जातो?
गाडीचा मेक आणि मॉडेल गाडी निर्मितीचे वर्ष गाडीच्या नोंदणीचे ठिकाण गाडीची सध्याची शोरूम किंमत गाडीचा मालक व्यक्ती आहे कि संस्था आहे नवीन गाडी आहे कि जुनी गाडी आहे यावर सुरुवातीचे व भविष्यातील हप्ते ठरवले जातात.९) थर्ड पार्टी म्हणजे काय?
ज्याच्या नावाने विमा घेतलेला आहे अशी व्यक्ती सोडून अपघातामुळे बाधित होणाऱ्या अन्य व्यक्ती ज्यामध्ये वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, रस्त्याने चालणाऱ्या व्यक्ती किंवा अन्य अशा व्यक्ती ज्या अपघातात सापडतात.१०) कोणत्या प्रकारची पोलिसी चांगली असते?
सर्व समावेशक (Comprehensive) इन्शुरन्स पोलिसी घेणे हे सर्वात चांगले असते ज्यामुळे तुम्हाला स्वतःला, तुमच्या सोबत सणाऱ्या सर्व व्यक्तींना विम्याचे कवच प्राप्त होते त्याच प्रमाणे थर्ड पार्टी इन्सुरन्सचे फायदे यात सामाविस्ट होतात. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे जर गाडीचे काही नुकसान झाले किंवा चोरी वगैरे झाली तर नुकसान भरपाई मिळते.११) क्लेममधून काय वजावट केली जाते?
याबाबतची सारी माहिती हि पोलिसी पेपर्समध्ये दिलेली असंगत. काही वेळा क्लेमच्या १०% रक्कम तुम्हाला भरावी लागेल असे लिहिलेले असते अशा वेळी जर तुम्ही रु.५०००० चा क्लेम दाखल केला तर तुम्हाला र.५००० भरावे लागतील. म्हणून पॉलिसी घेताना अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्व नियमांची माहिती करूनच घ्यावी, म्हणजे नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही.१२) जर तुम्हाला क्लेम करावा लागला नाही तर त्याचे काही फायदे मिळतात काय?
होय. जसे कि नो क्लेम डिस्काउंट मिळतो. हा डिस्काउंट पॉलिसीचे नूतनीकरण करताना तुम्हाला वजावट करून मिळतो. काही कंपन्या मोफत मेंटेनन्स चा फायदा देतात.१३) मोटार इन्शुरन्स घेताना कोणती काळजी घ्यावी?
मोटार इन्शुरन्स देणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत तेव्हा त्यातून एकाची निवड करताना काळजी घ्या. अन्य कंपन्यांच्या पॉलिसीबरोबर तुलना करा.मुदतीचा विमा